आयडियलतर्फे विनाशुल्क १६ वर्षाखालील कॅरम स्पर्धा १६ मार्चला

Santosh Sakpal February 27, 2025 04:05 PM

REPORTER/ SANTOSH SAKPAL

मुंबई:आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे विनाशुल्क १६ वर्षाखालील शालेय मुलामुलींची कॅरम स्पर्धा १६ मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. आनंदराव अडसूळ चॅरीटेबल ट्रस्ट व सिबिईयु सहकार्याने ही स्पर्धा दादर-पश्चिम येथील सिबिईयु सभागृहात रंगणार आहे.  पहिल्या ८ विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक चषकासह स्ट्रायकर पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती संयोजक लीलाधर चव्हाण यांनी दिली. तसेच शालेय खेळाडूंना तज्ञांचे मोफत मार्गदर्शन देखील लाभणार आहे.

ही स्पर्धा चँम्पियन कॅरम बोर्डवर बाद पध्दतीने होईल. प्रत्येक फेरीसाठी चार बोर्डची मर्यादा राहील.  आनंदराव अडसूळ चॅरीटेबल ट्रस्टतर्फे यंदापासून क्रीडा क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात येणार असून एप्रिलमध्ये सबज्युनियर कॅरमपटूना प्रोत्साहन देण्यासाठी सुपर लीग कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडूंना तेथे संधी लाभणार आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संबंधित शालेय खेळाडूंनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संघटन समितीचे प्रमोद पार्टे अथवा चंद्रकांत करंगुटकर (९९८७८ ३१६२२) यांच्याकडे २ मार्चपर्यंत संपर्क साधावा.

 

****************