मुंबई शिवनेर
बाळ गोपाळ-अभिलाषा गणेशोत्सव मंडळ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे सहकार्याने शालेय व कॉलेजमधील १८ वर्षाखालील मुलांची विनाशुल्क कॅरम स्पर्धा १३ सप्टेंबर रोजी काळाचौकी येथे आयोजित करण्यात आली आहे. विजेत्या-उपविजेत्यांना एकूण ८ आकर्षक चषक व स्ट्रायकर पुरस्कार दिला जाणार आहे.
मुंबईतील ज्युनियर खेळाडूंच्या मागणीनुसार मोफत स्पर्धात्मक सराव उपलब्ध करून देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी लायन्स डॉ. जगन्नाथराव हेगडे व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडाप्रेमी स्वप्निल शिंगे, रवींद्र गोनबरे, सिद्धेश ढोलम, शुभ्रतो वरेकर, ऋषिकेश शेडगे आदी मंडळी कार्यरत आहेत. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संबंधीत स्पर्धकांनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक [९००४७ ५४५०७] यांच्याकडे ३ सप्टेंबरपर्यंत संपर्क साधावा.