गोविंदराव मोहिते बुध्दिबळ स्पर्धेत सम्राट, जश, प्रिजेश, ध्रुव विजेते
Santosh Sakpal
June 02, 2024 05:36 PM
Mumbai -SHIVNER
अमृत महोत्सवी गोविंदराव मोहिते चषक बुध्दिबळ स्पर्धेमधील ८/१०/१२/१४ वयोगटात मुलांमध्ये सम्राट जिंदल, जश शाह, व्ही. प्रिजेश, ध्रुव जैन यांनी आणि मुलींमध्ये अनिश्का बियाणी, आराध्या पुरो, हुसैना राज, मयंका राणा यांनी विजेतेपद पटकाविले. याप्रसंगी गेली ५ दशके विविध क्रीडा स्पर्धांद्वारे खेळाडूंना प्रोत्साहन देणारे राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सोन्याची अंगठी देऊन आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक-अध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. यावेळी नामवंत बुध्दिबळपटू, क्रिकेटपटू, कॅरमपटू, कबड्डीपटू, व्यायामपटू, क्रीडा पत्रकार तसेच कामगार क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.
परेल येथील आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहात मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर जिल्ह्यातील नामवंत आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित सबज्युनियर बुध्दिबळपटूसह एकूण ११७ खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला होता. ८ वर्षाखालील मुलांमध्ये सम्राट जिंदलने (५ गुण) प्रथम, रेयांश सचदेवने (४ गुण) द्वितीय, ऐडेन लासराडोने (४ गुण) तृतीय आणि मुलींमध्ये अनिष्का बियाणीने (२ गुण) प्रथम, पृषा गाडाने (२ गुण) द्वितीय, भावना श्रॉफने (१ गुण) तृतीय; १० वर्षाखालील मुलांमध्ये जश शाहने (५ गुण) प्रथम, समर्थ गोरेने (४ गुण) द्वितीय, समक्ष कर्नावटने (३ गुण) तृतीय आणि मुलींमध्ये आराध्या पुरोने (४ गुण) प्रथम, नित्या बंगने (३ गुण) द्वितीय, वेदा कपूरने (३ गुण) तृतीय; १२ वर्षाखालील मुलांमध्ये व्ही. प्रिजेशने (४ गुण) प्रथम, लोबो फेरद्यनने (४ गुण) द्वितीय, विराज शाहने (३.५ गुण) तृतीय आणि मुलींमध्ये हुसैना राजने (२ गुण) प्रथम तर १४ वर्षाखालील मुलांमध्ये ध्रुव जैनने (४ गुण) प्रथम, अर्जुन पाधारीयाने (३ गुण) द्वितीय, आदित्य राणेने (२ गुण) तृतीय आणि मुलींमध्ये मयंका राणाने (५ गुण) प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जिंकला.
******************************