सुनील खोपकर, प्रॉमिस सैतवडेकर यांना आयडियल स्पोर्ट्स पुरस्कार
Santosh Sakpal
20, 8-31 12:27 AM
Mumbai: राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप तर्फे क्रीडा मार्गदर्शक सुनील खोपकर व प्रॉमिस सैतवडेकर यांना आयडियल स्पोर्ट्स पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आयडियल अकॅडमीच्या गेले दशकभर सुरु असलेल्या शालेय क्रीडा चळवळीमधील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा गौरव येत्या ९ सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांनी दिली. सेवाभावी शास्त्रीय क्रीडा मार्गदर्शनाचा लाभ शालेय खेळाडूंना भविष्यात जिल्हा-राज्य स्तरावर क्रीडा स्पर्धांसाठी उपयुक्त ठरत असल्यामुळे अनुभवी मार्गदर्शकांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे.
शालेय मुलामुलींना कबड्डी, कॅरम, बुध्दिबळ आदी खेळांसाठी मुंबई उपनगरीय घाटकोपर शाळांमध्ये क्रीडा मार्गदर्शक सुनील खोपकर तर मुंबई शहरामधील माझगाव परिसरातील शाळांमध्ये कबड्डी प्रशिक्षक प्रॉमिस सैतवडेकर विशेष कार्यरत आहेत. आयडियल अकॅडमीच्या शालेय सुपर लीग कबड्डी-कॅरम-बुध्दिबळ आदी खेळांच्या मोफत प्रशिक्षणासह स्पर्धांमध्ये दोघांनीही उत्तम सहकार्य केले होते. रोझरी हायस्कूल-डॉकयार्ड रोड येथे कबड्डी दिनी झालेल्या मॅटवरील आयडियल विनाशुल्क शालेय इनडोअर कबड्डी स्पर्धेप्रसंगी मार्गदर्शक सुनील खोपकर व प्रॉमिस सैतवडेकर यांचे राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक राणाप्रताप तिवारी यांनी देखील कौतुक केले होते. आयडियल अकॅडमीच्यावतीने हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद व आमचे ज्येष्ठ क्रीडा सल्लागार स्व. नारायण जनार्दन मोहिते यांना अभिवादन करण्यात आले.
******************************