भारताने ऑस्ट्रेलियाचा २० धावांनी उडवला धुव्वा! ३-१ अशी घेतली अजेय आघाडी

Santosh Sakpal December 01, 2023 11:04 PM

ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, जोश इंग्लिस आणि शॉन अॅबॉट तिसऱ्या टी-२० नंतर मायदेशी परतले आहेत.अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाचा पूर्णपणे नवीन संघ खेळताना दिसेल. त्याचबरोबर चौथ्या आणि पाचव्या टी-२० साठी भारतीय संघात श्रेयस अय्यर आणि दीपक चहर यांचा समावेश केला आहे. 



रायपूर  : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. टीम इंडिया सध्या मालिकेत २-१ने आघाडीवर आहे. भारताने पहिले दोन सामने जिंकले, तर तिसरा टी-२० सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. या मालिकेतील चौथा सामना आज रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होत आहे. आजचा सामना जिंकण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला, तर ते मालिका जिंकतील. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. मात्र, ट्रॅव्हिस हेड वगळता ऑस्ट्रेलियाचे सर्व अनुभवी खेळाडू मायदेशी परतले आहेत.

टी-२० मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा २० धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने मालिकेत ३-१ अशी अजेय आघाडी घेतली आहे.