कल्पेश म्हात्रे यांचे निधन
Santosh Gaikwad
April 27, 2023 06:58 PM
मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाचा डेकोरेटर कल्पेश म्हात्रे याचे गुरुवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने रुग्णालयातच निधन झाले. तो २८ वर्षांचा होता. त्याच्या पश्चात आई आणि भाऊ असा परिवार आहे. दीड महिन्यापूर्वीच लोकलमधून पडून जखमी झाला होता. तेव्हापासूनच त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.
दिवा येथे राहणारा कल्पेश २२ फेब्रुवारीला घरी परतताना गर्दीमुळे चालत्या ट्रेनमधून पडून गंभीर ज़ख़मी झाला होता. त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू होते. आठवडा भरापूर्वीच त्याला आयसीयुlतून जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आलं होतं.डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. त्याच्या प्रकृतीत सुधारत होत असतानाच आज सायंकाळी त्याला हृदयविकाराचा धक्का बसला आणि यात त्याचा जीवनाशी सुरू असलेला संघर्ष अचानक थांबला. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने कलपेशला श्रद्धांजली वाहण्यात आली.