SHIVNER NEWS AGENCY /REPORTER/ SANTOSH SAKPAL
मुंबई: राष्ट्रीय मिल मजदूर संघतर्फे कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती चषक राज्यस्तरीय शूटिंगबॉल स्पर्धा ८ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वा. श्रमिक जिमखाना, ना.म.जोशी मार्ग, मुंबई-४०० ०११ येथे आयोजित करण्यात आली आहे. मुंबई शूटिंगबॉल संघटना मान्यतेने होणाऱ्या स्पर्धेमध्ये नामवंत राष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग असलेले मुंबईसह राज्यातील बलाढ्य २४ संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनील बोरकर, शिवाजी काळे आदी पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
संस्थापक स्व. गं.द. आंबेकर यांच्या स्मृती सप्ताहामध्ये कामगार व त्यांच्या मुलांसाठी विविध क्रीडा, कला, सामाजिक उपक्रम राबविण्याची गेल्या अनेक दशकांची परंपरा कायम राखण्यासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर विशेष प्रयत्नशील आहेत. त्यांच्या पुढाकारामुळे यंदा ७ ते १३ डिसेंबर सप्ताहामध्ये ७ डिसेंबरला शालेय बुध्दिबळ स्पर्धा, ८ डिसेंबरला शूटिंगबॉल स्पर्धा, ९ ते १२ डिसेंबरला प्रथम श्रेणी व्यावसायिक पुरुष व महिला गट कबड्डी स्पर्धा, ९ डिसेंबरला कामगारांची क्रिकेट स्पर्धा, १० डिसेंबरला शालेय व कॉलेज कॅरम स्पर्धा, १३ डिसेंबरला समारोप सोहळा तसेच महिलांसाठी विविध क्रीडा उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
******************************