माझी माऊली चषक मोफत शालेय कॅरम स्पर्धा आजपासून - अव्वल ६४ खेळाडूंचा सहभाग
Santosh Sakpal
October 02, 2024 03:43 PM
मुंबई: सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ-जेजे व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आंतरशालेय १६ वर्षांखालील मुलांची विनाशुल्क कॅरम स्पर्धा ३ ते ७ ऑक्टोबर दरम्यान दैवत रंगमंच, जे. जे. हॉस्पिटल कंपाऊंड, भायखळा-पूर्व येथे आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत अव्वल ६४ खेळाडूंचा सहभाग असून सिद्धांत मोरे, उमैर पठाण, ध्रुव भालेराव, वेदांत राणे, प्रसन्न गोळे, पुष्कर गोळे, श्रीशान पालवणकर, जितेंद्र जाधव, गौरव मांजरेकर, प्रसाद माने, नैतिक लादे, अथर्व आरकर, समीर खान, अनय म्हेत्रे, आदेश महाडिक आदीच्या कामगिरीकडे विशेष लक्ष राहणार आहे.
अ गटात सर्वेश परुळेकर विरुद्ध समर्थ मयेकर यांच्या उद्घाटनीय लढतीने दुपारी ३ वाजता स्पर्धेला सुरुवात होईल. ब गटात वेदांत हळदणकर विरुद्ध मयांक पाल, क गटात प्रसन्न गोळे विरुद्ध हर्ष गावकर तसेच ड गटात पुष्कर गोळे विरुद्ध राहुल पाटील अशा सलामीच्या लढती रंगतील. या स्पर्धेत विजेत्या-उपविजेत्यांना एकूण १६ आकर्षक चषक-मेडल पुरस्कार दिले जाणार आहेत.
शालेय मुख्य कॅरम स्पर्धेअगोदर मुंबई व इतर जिल्ह्यातील शालेय खेळाडूंना स्पर्धात्मक सराव मिळण्यासाठी यंदा देखील २४वी शालेय कॅरम स्पर्धा भरविण्यात आली आहे. सब-ज्युनियर कॅरमपटूना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच चँम्पियन कॅरम बोर्डावर दर्जेदार स्पर्धेचे पूर्णपणे मोफत आयोजन करण्यासाठी नवरात्र महोत्सव मंडळाचे अध्यक्ष कृष्णा रेणोसे, सरचिटणीस भूषण परुळेकर, कार्यवाह चंद्रकांत करंगुटकर आदी विशेष कार्यरत आहेत.
....