मुंबई:
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे संस्थेचे क्रीडा सल्लागार व श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे माजी अध्यक्ष नरेंद्र राणे यांच्या षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्त विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धेचे आयोजन ४ व ५ मार्च रोजी करण्यात आले आहे. १५ वर्षाखालील व इयत्ता ९ वीपर्यंतच्या शालेय मुलामुलींसाठी ही स्पर्धा मोफत खुली आहे. स्पर्धेतील पहिल्या आठ विजेत्यांना आकर्षक चषक व 'स्ट्रायकर' देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
गेली दशकभर शालेय क्रीडा चळवळीमधील विविध उपक्रमांना प्रोत्साहन देणारे क्रीडापटू नरेद्र राणे यांच्या आग्रहास्तव शालेय खेळाडूंना मोफत कॅरम प्रशिक्षण शिबीर येत्या एप्रिलमध्ये वार्षिक परीक्षेनंतर देण्यात येणार असल्याचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांनी जाहीर केले. चँम्पियन कॅरम सेटवर ही स्पर्धा आरएमएमएस, परेल, मुंबई-१२ येथे होणार आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या शालेय खेळाडूंनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक (९००४७ ५४५०७) यांच्याकडे ३ मार्च-सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत संपर्क साधावा.
**************************************************************