उद्धव ठाकरेचं अखेर ठरल ! अयोध्येत जाणार नाही, २२ जानेवारीला काळाराम मंदिरात रामाचे दर्शन घेणार !*

Santosh Gaikwad January 07, 2024 12:00 AM



मुंबई :  अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. या सोहळ्याच्या  निमंत्रणावरून भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये वाद रंगला असतानाच उद्धव ठाकरे यांनी 22 जानेवारीला नाशिक येथील काळाराम मंदिरात जाऊन रामाचे दर्शन घेणार असून पंचवटी गोदावरी केली महारथी करणार असल्याचे मीडियाशी बोलताना सांगितले त्यामुळे उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले नसून, ते अयोध्येला जाणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, राम मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम हा धार्मिक आणि अस्मितेचा असावा. याला राजकीय रंग येऊ नयेत, आम्हाला देखील ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी आम्ही रामाच्या दर्शनाला जाऊ मात्र तोपर्यंत मानपाण्याचा कार्यक्रम बाजूला ठेवायला हवा, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच आपण २२ जानेवारी रोजी राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

नाशिकमध्ये देखील एक रामाचं मंदिर आहे. २२ जानेवारीला या मंदिराच्या प्रवेशासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि साने गुरुजी यांना संघर्ष करावा लागला होता. राम आमचा सुद्धा आहे, माझा सुद्धा आहे, हे सांगण्यासाठी त्यांना हा संघर्ष करावा लागला होता. त्यामुळे या काळाराम मंदिरात जाऊन आम्ही रामाचं दर्शन घेऊ, असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

प्रभू रामचंद्र काहीकाळ पंचवटीला देखील वास्तव्यास होते, त्या गोदातीरी आम्ही महाआरती करणार आहोत. 22 जानेवारीला अयोध्येला कोण जाणार कोण येणार यात मला पडायचं नाही. कारण तो दिवस आम्हाला अभिमानाचा अस्मितेचा दिवस आहे, असं उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.