वाघनखे आणणे हे मतांच्या राजकारणासाठी भाजपची योजना ;विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवारांचा आरोप

Santosh Gaikwad October 02, 2023 03:07 PM


नागपूर  : भारतीय जनता पक्ष शिवाजी महराजांच्या नावाचा वापर राजकारणापुरता करत असून वाघनखे आणणे हे मतांच्या राजकारणासाठी भाजपन आखलेली योजना आहे असा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.  नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी सवांद साधला त्यावेळी  बोलत होते. 


वडेट्टीवार  म्हणाले,  करोडो रुपये खर्च करून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचे भूमिपुजन करण्यात आले.मात्र अद्याप अरबी समुद्रात शिवरायांच्या स्मारकाचा पत्ता नाही.  महाराजच्या स्मारकासाठी आठ ते दहा कोटी रुपयांचे बजेट दाखवायचे  व दुसरीकडे वाघनखे उधार आणून महाराजांचा अपमान करायचा.


  वाघनखे महाराष्ट्रात आणण्यावरून भाजपावर निशाणा साधत वडेट्टीवार पुढे म्हणाले की ,  छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखे  खरी की खोटी हा नंतरचा विषय आहे.   शिवरायांची वाघनखं महाराष्ट्रात कायमस्वरुपी आण्यात येत  नसून तीन वर्षांसाठी वाघनखं महाराष्ट्रात येत आहेत. अशी उधार वाघनखे आणून महाराजांचा अपमान केला जातोय. असं म्हणत  हा  दिखाऊपणा आहे. महाराजांविषयी प्रेम असतं तर आतापर्यंत शिव  स्मारकाच्या कामाला  सुरुवात झाली  असती मात्र तसं  नकरता  आम्ही काहीतरी तीर  मारतोय अस दाखवायचं  आणि महाराजांच्या नावानं मत घेण्यासाठी वाघनखे आणण्याची  योजना  आखायची हा  भाजपाचा फंडा  असल्याचं आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.

०००००