शेतक-यांना बोगस बियाणे विकणाऱ्यांना किमान दहा वर्षे शिक्षा, लवकरच कायदा करणार : कृषीमंत्र्यांची घोषणा
Santosh Gaikwad
June 10, 2023 06:02 PM
अकोला : राज्यसरकार शेतक-यांच्या पाठीशी उभं असून, शेतक-यांना बोगस बियाणे, खतांचे विक्री करणा-यांना दहा वर्ष शिक्षेची तरतूद करण्यासाठी आगामी काळातील अधिवेशनात कायदा करणार असल्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अकोला येथे एका कार्यक्रमात केली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे
बोगस बियाणामुळे दुपार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढावले होते. त्यामुळे या संदर्भात कायदा करण्याची किंवा कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. आता या मागणीला सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला असून आगामी अधिवेशनात ज्यांच्याकडे बोगस बियाणे, औषधे किंवा खते असतील त्यांनी ते तात्काळ नष्ट करावी. बोगस बियाणे विकणाऱ्यांना किमान दहा वर्षे शिक्षा होईल, असा कायदा करणार असल्याचा अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने अनेक प्रयत्न आणि उपाय केले असल्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थित आम्ही खरीप हंगामाची बैठक आयोजित केली होती, त्यावेळी अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यांचे तात्काळ निराकरण करण्याचे काम राज्य सरकारने केला असल्याचा दावा त्यांनी केला. जे अधिकारी आणि कर्मचारी पैसे मागतात अशा ठिकाणी छापे टाकण्यात आले होते, असेही सत्तार यांनी सांगितले.
--------------------