राष्ट्रीय क्रीडा दिनी संत ज्ञानेश्वर चषक शालेय मोफत कॅरम स्पर्धा 

Santosh Sakpal August 22, 2024 08:34 PM

SHIVNER NEWS AGENCY


MUMBAI | ज्ञानेश्वर विद्यालय-वडाळा व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे सुमती सेवा मंडळ-दहिसर सहकार्याने राष्ट्रीय क्रीडा दिन-२९ ऑगस्ट निमित्त संत ज्ञानेश्वर चषक शालेय मोफत कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १६ वर्षाखालील व इयत्ता १० वीपर्यंतच्या शालेय मुलामुलींसाठी ही कॅरम स्पर्धा विनाशुल्क खुली आहे. सुमती सेवा मंडळाचे प्रमुख प्रमोद पार्टे यांच्या सौजन्याने स्पर्धेतील पहिल्या आठ विजेत्यांना आकर्षक चषक व 'स्ट्रायकर' देऊन गौरविण्यात येणार आहे.

नवोदित व उदयोन्मुख शालेय खेळाडूंना डीएसओ व इतर शालेय कॅरम स्पर्धांमध्ये उल्लेखनीय खेळासाठी प्रोत्साहन म्हणून सराव स्पर्धेचे आयोजन चँम्पियन कॅरम सेटवर ज्ञानेश्वर विद्यालय, वडाळा-पश्चिम, मुंबई-३१ येथे करण्यात आले आहे. स्पर्धेमधील खेळाडूंना अखिल भारतीय दर्जाचे पंच प्रणेश पवार, कॅरमपटू चंद्रकांत करंगुटकर आदींचे मोफत मार्गदर्शन लाभणार आहे. स्पर्धा दर्जेदार होण्यासाठी ज्ञानेश्वर विद्यालयाचे अध्यक्ष धैर्यशील जाधव, सचिव सुर्यकांत कोरे, खजिनदार भास्कर सावंत, मुख्याध्यापक महेंद्र पाटील, क्रीडापटू गोविंदराव मोहिते, क्रीडाप्रेमी प्रमोद पार्टे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या शालेय खेळाडूंनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक (९००४७ ५४५०७) यांच्याकडे २४ ऑगस्टपर्यंत संपर्क साधावा.