मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालावर निकालावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. कोर्टाच्या या निकालानंतर आता भाजपविरुद्ध प्रचार करणं सोप होईल, असं पवार म्हणाले आहेत.
लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र काम करण्याची गरज आहे, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. विरोधकांची मोठ बांधण्याची गरज आहे. महाराष्ट्रात देखील एकत्र काम करण्याची गरज आहे. ठाकरेंच्या राजीनाम्यावर चर्चेची गरज नाही, आत्ता चर्चा नको, असंही शरद पवार म्हणाले आहे.
नैतिकता आणि भाजप यांचा काही संबंध आहे, असं मला वाटत नाही, असं रोखठोक वक्तव्य शरद पवार यांनी यावेळी केलं आहे. महाविकास आघाडी अधिक जोमानं काम करणार. राज्यपालांची भूमिका चुकीचीच होती. राज्यकर्त्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयाने तीव्र भूमिका बांधली, असंही शरद पवार म्हणाले.