श्री नारायण गुरु कॉलेज कॅरम स्पर्धेत आजपासून ४८ खेळाडूंमध्ये चुरस
Santosh Sakpal
April 25, 2024 04:27 PM
मुंबई/NHI NEWS AGENCY
श्री नारायण गुरु कॉलेज ऑफ कॉमर्स व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे २६ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या विनाशुल्क एकेरी कॅरम स्पर्धेत विजेतेपदासाठी नामवंत कॉलेजमधील उदयोन्मुख ४८ खेळाडूंमध्ये चुरस होईल. पोद्दार कॉलेजचा अथर्व हुमणे विरुध्द विल्सन कॉलेजचा सुफीयान शेख यामधील उद्घाटनीय लढत शुक्रवारी सकाळी १०.३० वा. श्री नारायण मंदिर समितीचे जनरल सेक्रेटरी ओ.के. प्रसाद व कॉलेजचे प्राचार्य डॉ. रविंद्रन करथडी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. पहिल्या सोळा विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
चेंबूर-पश्चिम येथील श्री नारायण गुरु कॉलेजच्या जिमखान्यात हिंदुजा कॉलेजचा निलांश चिपळूणकर, पोद्दार कॉलेजचे रुची माचीवले व वरद साळगावकर, कराड येथील यशवंतराव चव्हाण कॉलेजचे फजील भालदार व साजीया भालदार, डॉ. टोपे कॉलेजचा अंकित मोहिते, श्री नारायण गुरु कॉलेजचे मंजिरी पै व शंतनू पोटे, एपीबी कॉलेजचा शेख फरहान, आचार्य-मराठे कॉलेजची प्रतीक्षा गाडगे, महाराष्ट्र कॉलेजचा साहिल शेख, सिध्दार्थ कॉलेजचा पृथ्वी बडेकर, खालसा कॉलेजचा कैफ शेख आदी उदयोन्मुख खेळाडू पूर्ण तयारीनिशी स्पर्धेत उतरत आहेत. स्पोर्ट्स डायरेक्टर प्रोफेसर पूनम मुजावर व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या स्पर्धेमधील पंचाची कामगिरी नामवंत कॅरम मार्गदर्शक सचिन शिंदे व क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक पाहणार आहेत.
******************************