श्री उद्यानगणेश मंदिर चषक जिंकण्यासाठी शालेय ३६ कॅरमपटूंमध्ये आज चुरस

Santosh Sakpal February 03, 2025 11:25 AM

     श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती मुंबई व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री उद्यानगणेश मंदिर चषक कॅरम स्पर्धा जिंकण्यासाठी मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी आदी जिल्ह्यातील शालेय ३६ ज्युनियर कॅरमपटूमध्ये चुरस राहील. अँटोनिओ दासिल्व्हा हायस्कूल-दादरचा अर्णव शिंगटे विरुध्द ठाकूर रामनारायण पब्लिक स्कूल-दहिसरचा विराज ठाकूर यामधील उद्घाटनीय लढत समितीचे अध्यक्ष प्रकाश परब व व्यवस्थापक संजय आईर, तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते संयोजक लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरु होईल. माघी गणेशोत्सवानिमित्त विनाशुल्क कॅरम उपक्रम आहे. ही स्पर्धा ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.०० वा.पासून शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानमधील मंदिर परिसरात रंगणार आहे.

   श्री उद्यानगणेश मंदिर चषकाच्या दावेदारीसाठी पोद्दार अकॅडमी-मालाड स्कूलचा पुष्कर गोळे व प्रसन्न गोळे, अँटोनिओ दासिल्व्हा हायस्कूल-दादरचा ध्रुव भालेराव, पार्ले टिळक विद्यालयाचा अमेय जंगम, एसकेकेई स्कूल-मुलुंडचा केवल कुळकर्णी, पाटकर विद्यालय-डोंबिवलीचे नील म्हात्रे, अर्णव गावडे, निधी सावंत, केतकी मुंडले व सारा देवन, श्री नारायण गुरु हायस्कूल-चेंबूरचा उमैर पठाण, शारदाश्रम विद्यामंदिरचा आरव अन्जर्लेकर, युनिव्हर्सल स्कूल-ठाणेचा श्रेवांश नाके, मायकल हायस्कूल-कुर्ल्याचा निखील भोसले, सेंट जोसेफ हायस्कूलचा सर्वेश परुळेकर, शिर्के हायस्कूल-रत्नागिरीची स्वरा मोहिरे, महात्मा गांधी विद्या मंदिर-वांद्रेची तनया दळवी, व्ही.एन. सुळे हायस्कूल-दादरची ग्रीष्मा धामणकर, आदर्श विद्या मंदिरची स्वरा गावडे, अस्पी नूतन अकॅडमी इंटरनॅशनल स्कूलची धर्मी शुक्ला आदी उदयोन्मुख ज्युनियर कॅरमपटू चँम्पियन कॅरम बोर्डवर शर्थीच्या लढती देतील. पहिल्या १६ विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक चषकासह स्ट्रायकर पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.