श्रीकांत चषक जिंकण्यासाठी ज्युनियर ४८ कॅरमपटूमध्ये चुरस
Santosh Sakpal
September 12, 2024 03:54 PM
मुंबई: श्रीकांत चषक आंतर शालेय-कॉलेज कॅरम स्पर्धा जिंकण्यासाठी ज्युनियर ४८ कॅरमपटूमध्ये १४ सप्टेंबर रोजी कांदिवली-पूर्व येथे चुरस होणार आहे. श्रीकांत स्पोर्ट्स क्लब-कांदिवली व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित १८ वर्षाखालील विनाशुल्क कॅरम स्पर्धेतील विजेत्या-उपविजेत्यांना एकूण ८ आकर्षक चषक व स्ट्रायकर पुरस्कार दिले जाणार आहेत. श्रीकांत स्पोर्ट्स क्लबने गणेशोत्सव साजरा करतांना यंदा प्रथमच ५ जिल्ह्यांच्या आंतर शालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेचा मोफत उपक्रम साकारला आहे.
विवा कॉलेज-विरारचे भव्या सोळंकी व जोनाथन बोनाल, आयएनजी इंग्लिश हायस्कूल-वसईचा श्रीशान पालवणकर, पार्ले टिळक विद्यालयाचा सार्थक केरकर, युनिव्हर्सल हायस्कूल-दहिसरचा वेदांत राणे, डॉ. आंबेडकर स्कूल-वरळीचा समीर खान, रुईया कॉलेजचा कौस्तुभ जागुष्टे, पाटकर विद्यालय-डोंबिवलीचे वेदांत पाटणकर व गौरांग मांजरेकर, साठे कॉलेजचा तृशांत कांबळी, वरळी सी फेस हायस्कूलचा रेहान शेख, अकबर पिरभॉय कॉलेजचे झहीर शेख व अवैस खान आदी ज्युनियर कॅरमपटू विजेतेपदाच्या दावेदारीसाठी सर्वोत्कृष्ट खेळ करण्याची शक्यता आहे. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष लीलाधर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकांत स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी प्रणव निकुंब, प्रकाश चेल्लारी, सिद्धेश पवार, स्वप्निल पाटील, मिलिंद गावकर आदी मंडळी कॅरम स्पर्धा दर्जेदार होण्यासाठी विशेष कार्यरत आहेत. पंचाचे कामकाज नामवंत पंच प्रणेश पवार व चंद्रकांत करंगुटकर हे पाहणार आहेत.
******************************