सिंधुदुर्ग : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अपघात प्रकरणी आता महाविकास आघाडीचे नेते मैदानात उतरले आहेत.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे पाहणीसाठी आले त्यावेळी आदित्य ठाकरे दाखल होताच प्रवेशद्वारावर राडा झाल्याचे पाहायला मिळाला. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि राणे समर्थकांमध्ये मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांनी लगेच कार्यकर्त्यांना बाजूला घेतले. मात्र आक्रमक कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यावेळी आदित्य ठाकरेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मालवण येथील राजकोट किल्ल्यावर भाजप खासदार नारायण राणे आणि निलेश राणे समर्थकांसह दाखल झाले होते. पाहणी करुन नारायण राणे आणि निलेश राणे समर्थकांसह परत निघालेले असताना मविआचे पदाधिकारी देखील तिथे दाखल झाले होते. आदित्य ठाकरे, विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यावेळी तिथं पोहोचले होते. शिवसैनिक आणि राणे समर्थक आमने सामने आले होते. याठिकाणी थोडी बाचाबाची झाली. मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान राखत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. राणे समर्थकांनी राजकोट किल्ल्याच्या प्रवेश तू आराजवळ आंदोलन केल्याने आदित्य ठाकरे आणि महविकास आघाडीच्या नेते v कार्यकर्त्यां तब्बल दोन तास राजकोट किल्ल्यावर ठाण मांडला होता. अखेर पोलिसांनी समझोता केल्यानंतर अखेर आदित्य ठाकरे प्रचंड पोलीस बंदोबस्तात बाहेर पडले यावेळी दोन्ही गटाकडून
मालवणमध्ये महाविकास आघाडीने मोर्चाचं आयोजन केलंय. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, जयंत पाटील, भास्कर जाधव, विनायक राऊत हे मोर्चात सहभागी होतील. आज मालवणमध्ये भरड नाका ते मालवण तहसीलदार कार्यालय असा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाची एवढी घाई का करण्यात आली. तसेच या घटनेशी संबंधित सर्व अधिकारी, कंत्राटदार व इतर यंत्रणेच्या बेजबाबदारीचा जाब या आंदोलनाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना विचारण्यात येणार आहे. यासह पक्षाच्यावतीने सर्व राज्यभरात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी स्थानिक पातळीवर आंदोलन करण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, 24 वर्षाच्या मुलाला कंत्राट कोणी दिले? ते फरार आहे त्याला पळून जाण्यासाठी कोणी मदत केली? पीडब्ल्यूडीचे मंत्री आहेत त्यांच्यावर एफआयआर दाखल झाली आहे का? हे अत्यंत दुर्दैवी आहे.मी येत असताना राडा झाला. पत्रकाराला धक्काबुक्की झाली. मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे की, महाराजांच्या किल्ल्यांमध्ये आपल्याला राजकारण करायचे नाही म्हणून मी कार्यकर्त्यांना देखील अडवले आहे. या बालीशपणात मला पडायचे नाही. पुतळ्याची सर्व जबाबादारी झटकली आणि नौदलावर त्याचे खापर फोडण्यात आले. महाराष्ट्रात ज्या काही घटना होत आहे. भ्रष्टाचारी खोके सरकार यांचा भ्रष्टाचार वरपासून खालपर्यत आहे. आता यांच्या भ्रष्टाचाराने महाराजांना देखील सोडले नाही. असे आदित्य ठाकरे म्हणाले.