मुंबई: रेकी-उसुई शिकी र्योहो यांच्या प्रेरणेने कार्यरत असलेल्या आर्ट ऑफ हिलिंग संस्थेद्वारे झालेल्या उसुई पध्दतीच्या नैसर्गिक उपचार प्रक्रियेचा मास्टर डिग्री कोर्स सुनिता चव्हाण यांनी गेल्या दोन वर्षात यशस्वी करून रेकी मास्टर डिग्रीचा सन्मान मिळविला. रेकी ग्रँडमास्टर शारदा कर्वे यांच्या हस्ते सुनिता चव्हाण यांना पुणे येथील रामि ग्रँड हॉटेलमधील समारंभात प्रमाणपत्र बहाल करण्यात आले.
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या महिला क्रीडा विभाग प्रमुख असलेल्या सुनिता चव्हाण यांनी रेकी मास्टरी यशस्वी केल्यामुळे शेकडो क्रीडा स्पर्धा आयोजित करणाऱ्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या भावी उपक्रमात जखमी होणाऱ्या क्रीडापटूंना त्याचा लाभ होणार आहे. रेकीद्वारे दुखापतग्रस्ताला नैसर्गिकरीत्या उपचार करण्याच्या पद्धतीमुळे त्याला इतर कोणत्याही प्रकारच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागत नाही. परिणामी या उपचार पद्धतीकडे वाढता कल आहे. म्हणून आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे विविध क्रीडा स्पर्धांसोबत दुखापतग्रस्त खेळाडूंची काळजी घेण्यासाठी मोफत रेकी शिबिराचे लवकरच आयोजन देखील करण्यात येणार आहे.
*********************************************************************