मुंबई :दहाव्या पुमसे तायक्वांदो चॅम्पियनशिप व सोळाव्या रत्नागिरी जिल्हा ओपन चॅलेंज क्युरोगी स्पर्धेत ल.ग. पटवर्धन शाळेची चौथीतील विध्यार्थिनी स्वरा साखळकरने २ सुवर्णपदके, १ रौप्य पदक व १ कांस्य पदक असे एकूण ४ पदके पटकाविण्याचा पराक्रम केला. सेवावृत्ती शिंदे गुरुजी सभागृह, नवभारत छात्रालय दापोली येथे झालेल्या स्पर्धेत विविध जिल्ह्यातून ६०० खेळाडूंनी भाग घेतला होता.
पुमसे प्रकारात सब ज्युनिअर कॅटेगरीमध्ये स्वरा साखळकरने सुरुवातीलाच सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्यानंतर सिंगल पुमसेमध्ये रौप्य पदक मिळवून तिने आपल्या नावावर दुसऱ्या पदकाची नोंद केली. क्यूरोगी सबज्यूनिअर गटामध्ये स्वराने दुसरे सुवर्णपदक जिंकले. शेवटी झालेल्या कॅडेट गटामध्ये स्वरा साखळकरने कांस्यपदक मिळवून आपल्या पदकांचा चौकार पूर्ण केला. स्पर्धेच्या सरावासाठी स्वराला एसआरके तायक्वांदो क्लबचे प्रशिक्षक शाहरुख शेख यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते. दर्जेदार कामगिरी करणाऱ्या स्वरा साखळकरचे तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे खजिनदार व्यंकटेश करा, अमोल सावंत यांनी अभिनंदन केले.
******************************