ठाण्यातील कु. कशिश आणि कु. जिया तडवीचे सुवर्ण यश
ठाणे : मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत ठाण्यातील दोन बहिणींनी सुवर्णपदक पटकावले आहे. कु. कशिश रमजान तडवी, वय - १० वर्ष, ( ब्लूक बेल्ट )काता यामध्ये सुवर्ण पदक तसेच कुमिते गोल्ड व तीची छोटी बहीण कु. जीया रमजान तडवी वय - ८ वर्ष( ग्रीन बेल्ट )काता या मध्ये गोल्ड मेडल तसेच कुमिते गोल्ड मेडल मिळवले आहे. दोन्ही बहिणींच्या यशाचे सर्वत्रच कौतूक होत आहे.
२१ वी इंटरनॅशनल स्पोर्ट्स जीत कुणे -डो चॅम्पियनशिप कराटे स्पर्धा कांदिवली येथील आर्या समाज भवन श्री दयानंद विद्यालय सेक्टर नंबर-1, चारकोप मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भारत,कॅनडा,नेपाळ, भूतान, बांगलादेश या देशांमधुन ६१० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. कशिश आणि जीया या दोघी बहिणींचे जळगाव जिल्हयातील जानोरी गावाचे आहेत. त्यांचे आई वडील पोलीस दलात कार्यरत आहेत. ठाणे येथील ठाणे पोलीस स्कूल मध्ये दोघी शिक्षण घेत आहेत. आई वडीलांकडून दोघींना वेळोवेळी प्रोत्साहन मिळाल्याने आणि सेनसाई जाहीर शेख सर व सेनसाई सलीम अन्सारी यांच्या मार्गदर्शनाने हे यश मिळवल्याचे कशिश आणि जीया यांनी सांगितले.