डॉ. अमित थडानी पुढे म्हणाले, नास्तिकतावाद्यांच्या हत्या प्रकरणात दर 2-3 वर्षांनी काही लोकांना पकडण्यात आले आणि तेच खुनी म्हणून सांगितले गेले. प्रत्येक वेळी त्यांना अडकवण्यासाठी प्रत्यक्ष साक्षीदार उभे करण्यात आले, प्रत्येक वेळी खुनी पालटले गेले, शस्त्रे पालटली गेली, शस्त्रांचे ‘फॉरेन्सिक लॅब’चे अहवाल वेगवेगळे होते. ठाणे खाडीत शस्त्र शोधण्यासाठी विदेशी यंत्रणा आयात करून त्यावर जनतेचे करोडो रुपये खर्च करण्यात आले. शस्त्राचे सुटे भाग वेगळे करून खाडीत फेकल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे, तर खाडीतील शोधातून पूर्ण पिस्तुल मिळाल्याचा दावा करण्यात आला. हा विनोद नाही, तर अशाच सर्व परस्परविरोधी घटना आरोपपत्रात आहेत. यासंदर्भात तत्कालीन राज्यकर्त्यांनी तपासापूर्वीच गोडसेवादी विचारसरणीच्या लोकांना दोषी घोषित केले होते. या राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांनी त्याच दिशेने एकांगी तपास केला. त्यातच सत्य जाणण्यापेक्षा काही प्रसिद्धीमाध्यमांनीही ‘मिडिया ट्रायल’ करून तपास भटकवण्यास हातभार लावला. याचा मोठा दुष्परिणाम या अन्वेषणावर झाला. हिंदुत्ववादी संघटनांच्या निष्पाप लोकांना अनेक वर्षे छळ करून कारागृहात डांबून ठेवण्यात आले आहे’, असे डॉ. थडानी म्हणाले.
हिंदूंच्या बदनामीचे षड्यंत्र हे पुस्तक उघड करते – रतन शारदा
हिंदू आणि हिंदुत्व यांवर कोणत्याही पुराव्याविना आरोप करण्यात आले. ‘भगवा आतंकवाद’ म्हणून हिंदूंना लक्ष्य केले जाते. हिंदूच विवेकवादी आहेत. ते चर्चेसाठी नेहमीच सिद्ध असतात; परंतु काही गुन्ह्यांमध्ये हिंदूंना अडकवून हिंदुत्वाची बदनामी करण्याचे षड्यंत्र काहींकडून चालू आहे. बागेश्वरधामविषयी बोलले जाते; परंतु चंगाई सभांद्वारे हिंदूंविरोध कट चालू आहेत, त्यांविषयी मात्र बोलले जात नाही. ‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ The Rationalist Murder या पुस्तकामध्ये लेखकांनी अत्यंत खोलवर विचार मांडले आहेत. हिंदूंवर वेळोवेळी झालेल्या अन्यायाला या पुस्तकातून वाचा फोडण्यात आली आहे. आम्ही डॉ. अमित थडानी यांच्या पाठीशी आहोत, असे रतन शारदा म्हणाले.
सत्य जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचावे – केतकी चितळे
डॉ. थडानी यांनी लिहिलेल्या पुस्तकात संशोधन करुन तथ्य मांडले आहे. अनेकदा काही प्रसारमाध्यमांतून एक विशिष्ट मतप्रवाह निर्माण केला जातो. तटस्थ राहून डॉ. थडानी यांनी पुस्तकात हत्येविषयी पोलिस तपास तसेच न्यायालयात क़ाय घडले यांविषयीची वस्तुस्थिती समोर ठेवली आहे. ज्यांना सत्य जाणून घ्यायचे आहे त्यांनी डॉ. थडानी यांचे पुस्तक वाचावे, असे केतकी चितळे म्हणाल्या.
हे पुस्तक प्रश्न विचारण्याची हिंमत देते – ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर
डॉ. थडानी यांनी हत्यांच्या तपासात बऱ्याच चुकीच्या बाबी तपास यंत्रणाकडून झाल्या आहेत हे मांडले आहे, त्यावर प्रश्न विचारण्याची हिंमत या पुस्तकाचे लेखकांनी दाखवली आहे, गुजरात दंगली, मालेगाव स्फोट खटला, भीमा कोरेगाव प्रकरणातील स्टॅन स्वामी अशा अनेक प्रकरणांत प्रश्न विचारले जावेत. चार खुनांची चर्चा होते पण कम्युनिस्ट विचारांच्या नक्षलवाद्यांनी ज्या 14000 पेक्षा जास्त हत्या केल्या त्याची कोठेही चर्चा होताना दिसत नाही, असे ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले.