52, Municipal Ind. Estate,
Dainik Shivner Marg,
Worli, Mumbai - 400018 (India)
पुणे: पुण्यात पुणे-बंगलोर महामार्गावरील नवले पुलाजवळ स्वामी नारायण मंदिर येथे आज मध्यरात्री ट्रक आणि ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या घटनेमध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला असून २२ जण जखमी झाले आहेत.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बंगलोर महामार्गावरून मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरवरून मुंबईच्या दिशेने २५ प्रवाशांना घेऊन एक ट्रॅव्हल बस जात होती. त्याच दरम्यान साखरेची वाहतूक करणार्या ट्रकने पाठीमागून ट्रॅव्हल बसला जोरात धडक दिली. या धडकेत बस आणि ट्रक पलटी झाली. या घटनेमध्ये २२ जण जखमी झाले आहेत, तर तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेतील जखमींना जवळील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.