कर्जमाफी

Santosh Sakpal April 06, 2025 02:24 PM


कर्जमाफी 


कर्जमाफीचा प्रश्न हा

क्षुल्लक क्षणिक आहे 

शेतकऱ्यांच्या नशिबी 

नकली 'माणिक'आहे 


कर्जमाफीसाठी 

शेतकरी झुरत आहे 

शिक्षा झालेला चोरच

त्याचे बाखोटे धरत आहे 


कर्जमाफी राहिली दूरच 

वर लाखोल्यांचा भत्ता आहे

फसवणूक करणाऱ्यांच्या 

हाती आज सत्ता आहे. 


-नरेंद्र विश्वनाथराव वाबळे 

9820152936