मुंबई - रिपब्लिकन पक्षाची राजकीय वाटचाल आणि पक्ष संघटनात्मकबांधणी याबाबतचे चिंतन करण्यासाठी येत्या दि. 9 एप्रिल रोजी लोनावळयापासुन जवळ कामशेत येथील हिरकणी रिसॉर्ट येथे रिपब्लिकन पक्षाच्या राज्यस्तरीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या चिंतन शिबीरात रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख नेते; राज्य कार्यकारिणी सदस्य, विभागीय अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष आणि सरचिटणीस यांनाच चिंतन शिबीरात उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. या चिंतन शिबीरात अनेक ज्येष्ठ विचारवंत आणि पत्रकार रिपब्लिकन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिली आहे.
राज्यातील विविध राजकीय घडामोडी आणि रिपब्लिकन पक्षाची संघटनात्मक बांधणी या विषयांवर राज्यभरातील रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत रिपब्लिकन पक्षाचे चिंतन शिबीर येत्या बुधवार दि. 9 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता हिरकणी रिसॉर्ट ;जुना मुंबई पुणे रस्ता कामशेत टोनी ढाब्याजवळ तालुका मावळ जिल्हा पुणे येथे आयोजित केले आहे. या चिंतन शिबीरात ज्यष्ठ विचारवंत शरणकुमार लिंबाळे, एड. दिलीप काकडे, पत्रकार अरुण खोरे आदि मान्यंवर या शिबीरात रिपब्लिकन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या राज्यस्तरीय चिंतन शिबीरात रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, कार्याध्यक्ष बाबुराव कदम, सरचिटणीस गौतम सोनवणे आदि मान्यंवर उपस्थित राहणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव सुर्यकांत वाघमारे यांनी दिली आहे.