नवी मुंबईतील बेलापूर येथे नवीन शाखेच्या उद्घाटनाने फेडरल बँकेने वाढवली आपली उपस्थिती
Santosh Sakpal
October 31, 2023 07:43 PM
फेडरल बँकेने नवी मुंबईतील बेलापूर येथे आपली नवी शाखा सुरु केली आहे. ही या विभागातील त्यांची २१ वी शाखा आहे. या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून महाराष्ट्र सरकारच्या (एमएसआरएलएम) चे ॲडिशनल डायरेक्टर आणि सीओओ परमेश्वर एम राऊत यांच्यासह, सीबीडी बेलापूरच्या नाव्हियो शिपिंग प्रा. लिमिटेड चे चेअरमन अजय थंपी, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड चे वित्तीय सल्लागार आणि चीफ अकाऊंट ऑफिसर मॅथ्यू फिलिप, बीजी ग्रुप ऑफ कंपनीज चे एमडी बाबू जॉर्ज, फेडरेल बँकेचे अधिकारी असलेले मुंबई झोनचे झोनल हेड आणि एसव्ही पी महेश आर., नवी मुंबईचे डीव्हीपी २ आणि रिजनल हेड अजोय एस, सर्कल बिझनेस हेड -गव्हर्मेंट ॲन्ड इन्स्टिट्युशनल बिझनेस डिपार्टमेंट सागर देशपांडे आणि मॅनेजर तसेच ब्रॅन्च हेड योगेश व-हाडपांडे इत्यादी मान्यवरांचा समावेश होता. या शाखेच्या उद्घाटनासह स्थापना दिनाचे औचित्य साधून राजस्थान, कर्नाटक, तेलंगाणा, महाराष्ट्र,दिल्ली आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये बँकेतर्फे ६ नवीन शाखांची सुरुवातही केली.
ही संरचनात्मक वाढ म्हणजे बँकेच्या ग्राहकांना अधिक चांगली वित्तीय सेवा देऊन देशातील वैविध्यपूर्ण भागात सेवा देऊन समाजातील घटकांची आर्थिक वाढ करण्याच्या वचनबध्दतेचा एक भाग आहे.
या नवीन शाखांच्या माध्यमातून सर्वसमावेशक बँकिंग उत्पादने आणि सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार असून यामध्ये पर्सनल बँकिंग, बिझनेस बँकिंग, कर्जे, बचत आणि चालू खाती, गुंतवणूकीचे पर्याय आणि अशा विविध गोष्टींचा समावेश आहे. फेडरल बँकेच्या अनुभवाने समृध्द अशा व्यावसायिक कर्मचाऱ्यांचा संघ हा प्रत्येक शाखेत उपलब्ध असेल आणि तो ग्राहकांना वैयक्तिक स्तरावर वित्तीय सल्ला आणि सहकार्य प्रदान करेल. या सात स्थानांची निवड ही अगदी काळजी पूर्वक करण्यात आली असून त्यामुळे व्यक्ती, व्यवसाय आणि व्यापारी यांना गुणवत्तापूर्ण बँकिंग सेवा सहज उपलब्ध होऊ शकतील.
फेडरल बँके कडून आपले नेटवर्क संपूर्ण भारतात वाढवले जात असतांनाच दुसरीकडे व्यक्ती, व्यवसाय आणि समाजाला सक्षम करुन त्यांच्या अनोख्या बँकिंग गरजा पूर्ण करण्यासाठी योग्य बँकिंग उपाय देऊ केले आहेत. बँकेच्या संस्थापकांच्या १०६ व्या जन्मदिनाचे औचित्य साधून बँकेने अनेक उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले आहे, यामध्ये स्वच्छता मोहिम, फेडरल बँक हॉर्मिस मेमोरियल फाऊन्डेशन स्कॉलरशिप्स ची ६ राज्यांत घोषणा, रक्तदान शिबीर, कर्मचाऱ्यांसाठी कपडे दान करण्याची मोहिम, चेन्नई आणि कर्नाटकातील बेळगावी येथे दोन नवीन फेडरल स्कील ॲकेडमीजच्या सुरुवातीची घोषणा, फेडरल स्कील ॲकेडमीच्या काईम्बतूर आणि कोल्हापूर शाखेतील फाऊन्डेशन बॅचचे उद्घाटन असून कोईम्बतूर येथे विशेषरुपाने पहिल्या टेलरिंग बॅचची सुरुवात करणे इत्यादींचा समावेश आहे. आरोग्य सुविधा, शिक्षण आणि शाश्वतता या गोष्टी बँकेच्या प्राथमिकते मध्ये असून बँके कडून या आर्थिक वर्षात यामध्ये भरीव योगदान देण्यात येणार आहे.